बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध

 बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्धमुंबई : यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना तीन एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 23 एप्रिल पासून इयत्ता बारावी बोर्डाची ची परीक्षा राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यानुसार आता या परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील.

विभागीय मंडळाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉलतिकीटची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिल्यानंतर हॉल तिकीट वर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का त्या हॉल तिकीटवर असणे आवश्यक आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post