मुदतबाह्य खाद्यपदार्थ व अस्वच्छता...नगरमधील ‘या’ हॉटेलचा परवाना निलंबित

मुदतबाह्य खाद्यपदार्थ व अस्वच्छता...नगरमधील औरस हॉटेलचा परवाना निलंबित नगर ः मुदत संपलेले खाद्यपदार्थ ठेवल्याने व किचनमध्ये अस्वच्छता आढळून आल्याने, सावेडीतील औरस हॉटेलचा (कपिराज) परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्‍त संजय शिंदे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या डिसेंबरमध्ये हॉटेलमधील खाद्यपदार्थ व किचनची तपासणी करण्यात आली. औरस हॉटेलची तपासणी 30 डिसेंबर रोजी अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी केली. हॉटेलच्या किचनमध्ये झुरळे आढळून आली होती. गोदामातील अन्नपदार्थ अस्ताव्यस्त, मुदतबाह्य असल्याचे, तसेच ब्रेड व बेकरी पदार्थांवर कोणत्याही प्रकारचे लेबल आढळून आले नाही.  त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनास 6 जानेवारी रोजी नोटीस देण्यात आली. तिला मुदतीत उत्तर न दिल्याने 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. त्यात हॉटेल व्यवस्थापनाने समाधानकारक खुलासा न केल्याने, सात दिवसांसाठी परवाना निलंबित करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post