राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी...गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

 राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी...गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा
मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आजच दिले. यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक झाली. स्वत: शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा केली. यानंतर गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर लगेचच विरोधी पक्ष भाजपने गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post