थयथयाट केल्याने मेलेले लोक जिवंत होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य....

थयथयाट केल्याने मेलेले लोक जिवंत होणार नाहीत, हरियाणाचे मुख्यमंत्र्यांचे धक्कादायक वक्तव्य....

 


चंदीगड:  हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केलं आहे. थयथयाट केल्याने मेलेले लोक परत येणार नाहीत. हे नैसर्गिक संकट आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं धक्कादायक विधान मनोहर लाल खट्टर यांनी केलं आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मनोहर लाल खट्टर रुग्णालयात आले होते. यावेळी एका पत्रकाराने त्यांना मृतांच्या आकड्यांवरून प्रश्न विचारला असता संतप्त झालेल्या खट्टर यांनी हे धक्कादायक विधान केलं. मैत्री संबंधामुळे कोरोनाच्या रुग्णांचे आकडे आम्ही मीडियाला देत असल्याचं जनसंपर्क अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. जनतेला उत्तर देण्याची आमची जबाबदारी नाही, असा सवाल या पत्रकाराने खट्टर यांना केला. त्यावर, ही वेळ आकड्यांवर लक्ष ठेवण्याची नाहीये. ज्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या थयथयाटाने जिवंत होणार नाहीत. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, असं खट्टर म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post