हनुमान जयंती...माळीवाडा येथे शनी मारुती मंदिरात महापुजा

 माळीवाडा येथे शनी मारुती मंदिरात महापुजा 

शहरात विविध ठिकाणी हनुमान जयंती साध्या पद्धतीने साजरी     नगर - माळीवाडा येथील शनी-मारुती मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अगदी  साध्या पद्धतीने  साजरा करण्यात आला. सकाळी ठिक 6 वा. जन्मोत्सवाच्यावेळी श्री विशाल गणेश मंदिरतील पुजारी संगमनाथ महाराज यांच्या  हस्ते अभिषेक करुन महापुजा करण्यात आली. यावेळी श्री विशाल गणपती मंदिर देवस्थानचे सचिव अशोक कानडे, गणेश राऊत ,गणेश भालेराव आदिं उपस्थित होते. यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच मंदिर परिसर फुलांसह आकर्षक सजावटीने सजवण्यात  आला होता .

     .     मागील वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने सर्व मंदिरे सध्या बंद आहे . राज्यसरकाराने कोरोना मुळे अगदी काही मोजक्या लोकांच्या उपस्थित धार्मिक कार्यक्रम साध्या पद्दतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भाविक घरी राहूनच विविध सण ,उत्सव,जयंती साजरी करताना दिसत आहे .     

          हनुमान जयंतीनिमित्त गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात ऑनलाईन पद्धतीने फेसबुक लाईव्ह  हनुमान चालिसा पाठाचे आयोजनहि  करण्यात आले होते. 

नगर मधील माळीवाडा , सर्जेपुरा ,लक्ष्मी कारंजा ,बुरड गली, दिल्लीगेट,सावेडी ,मुकुंद नगर ,झेंडीगेट, आदीसह धनगरवाडी येथील हनुमान मंदिर येथेही  फुलांची आकर्षक सजावट करून विधीवत पूजा करण्यात आली होती .  सर्वच   हनुमान मंदिरात साध्या पद्धातीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. तसेच      

नगर शहरातील विविध तालीम त्यामध्ये कोठीची तालीम ,गणपतीची तालीम ,वाडिया पार्क तालीम ,नालेगाव येथील सातपुते तालीम,नाना पाटील वस्ताद तालीम,झारेकर गल्ली येथील हनुमान व्यायाम शाळा ,तोफखाना येथील जंगूभाई तालीम  आदी ठिकाणी हनुमान जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post