नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे बदल केला पाहिजे

नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे बदल केला पाहिजे


 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे स्वत:च्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या फॅसिस्ट धाटणीच्या राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक वेगळे केले. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि एक मधला मार्ग निवडण्यासाठी उद्धव ठाकरे  यांनी स्वत:मध्ये बदल घडवले. पंतप्रधान मोदी यांनीही तसचं काहीसं केलं पाहिजे, असे रामचंद्र गुहा यांनी सांगितले. 

‘द वायर’ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी यासंदर्भात सविस्तर भाष्य केले. यावेळी मुलाखतकार करण थापर यांनी पंतप्रधान मोदी बदलतील का?, असा प्रश्न गुहा यांना विचारला. यावर गुहा यांनी, ‘मोदी यांचे व्यक्तिमत्व त्यांना तसे करू देईल का’, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. व्यक्ती कालानुरूप बदलू शकतात, याचे रामचंद्र गुहा यांनी उद्धव ठाकरे यांचे उदाहरण दिले. उद्धव ठाकरे हे त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा फार वेगळे आहेत. फॅसिस्ट विचारसणीत वाढलेले उद्धव अधिक मनमोकळेपणाने विचार करणारे आहेत. एखाद्या व्यक्तीला पंथाचा दर्जा मिळतो, अशा वातावरणामध्ये एका मोठ्या व्यक्तीसोबत उद्धव ठाकरेंनी आयुष्यातील बराच काळ घालवला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post