सोनं 40 हजारांच्या खाली येण्याची शक्यता...गुंतवणुकसाठी मोठी संधी
मुंबई : सध्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रति तोळा ४४ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहचला होता. ऑगस्ट २०२० मध्ये सोनं प्रति तोळा ५६ हजार रुपयांपर्यंत पोहचलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये झपाट्यानं घट होत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याची किंमत प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली येऊ शकते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आणखी काही दिवस वाट पाहा. सध्याच्या घडीलाही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे.
ऑक्टोबर २०१९ मध्ये सोनं प्रति तोळा ४० हजार रुपयांच्या खाली होतं. तेव्हापासून अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार युद्ध आणि नंतर कोरोना आलेलं कोरोना महामारीचं संकट, यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ पाहायला मिळाली. काही गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवत आहे.
Post a Comment