नगर तालुक्यात वीज पडुन १४ शेळ्या दगावल्या

 घोसपुरीत वीज पडुन १४ शेळ्या दगावल्या
 नगर- तालुक्यातील घोसपुरी येथे आज दुपारी वीज पडुन दोन शेतकऱ्यांच्या  १४ शेळ्या दगावल्या . प्रशासनाने त्याचा पंचनामा केला असुन या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे .

नगर तालुक्यात गेल्या तीन -चार दिवसांपासुन ढगाळ हवामान आहे . अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी ही लावली . काही गावात वादळ व सुसाट वारा वाहत आहे .आज  सुमारास घोसपुरीतील  बाळासाहेब दातीर व भगवान बुलाखे हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी माळरानावर गेले होते . दुपारी दोनच्या सुमारास वीजांचा कडकडाट सुरू झाला . वीज शेळ्यांवर पडल्याने या दोन्हीही शेतकऱ्यांच्या मिळुन १४ शेळ्या जाग्यावरच मृत्युमुखी पडल्या . दातीर व बुलाखे हे दोघेही शेळ्या पालन करून आपला उदरनिर्वाह करीत होते . मात्र आज दोघांच्या १४ शेळ्या मरण पावल्याने त्यांचा मोठा आर्थिक आधार ढासळला आहे .जी. प . सदस्य संदेश कार्ले यांनी प्रशासनाला याची खबर दिल्याने तलाठी व पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी  मृत शेळ्यांचा पंचनामा केला . हे दोन्ही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post