करोना चाचणीसाठी जादा दर आकारणी, नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले आवाहन

 करोना चाचणीसाठी अनेक खासगी हॉस्पिटल्समध्ये जादा दर आकारणी, नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले आवाहननगर : करोना महामारी, लॉकडाऊनमुळे अर्थकारणावर मोठा परिणाम झालेला असून आता रूग्णसंख्याही वेगाने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. बेड मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना राजकीय नेते, पदाधिकारी, नगरसेवक यांची मदत घ्यावी लागत आहे. त्यातच शासनाने करोनासाठीच्या आरटीपीसीआर चाचणीचे दर कमी केले असताना अनेक खासगी हॉस्पिटलकडून करोना चाचणीसाठी 1000 ते 1500 रुपये घेण्यात येत आहेत. हि गोष्ट अतिशय चुकीची असून असे जादा पैसे घेतले जात असल्यास जिल्हा प्रशासनाकडे अथवा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदारांकडे तक्रार करावी असे आवाहन शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले आहे. 

याबाबत गाडे यांनी करोना चाचणीचे शासनाने निर्धारित केलेले दर तसेच अन्य माहिती देत राजकीय मंडळींनी आताच्या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांसाठी पुढे येत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गाडे यांनी म्हटले आहे की, नगर शहरात एक नगरसेवक म्हणून अनेक लोक करोना चाचणीसाठी व उपचार मिळण्यासाठी आम्हाला फोन करतात. त्यांना शक्य होईल तेवढी मदत आम्ही नगरसेवक करत असतो. डॉक्टरही कोविड रुग्णांची मदत करत आहेत  व त्यांच्यामुळे लोक बरेही होत आहेत पण दुःख याचे वाटत आहे की, अनेक खाजगी हॉस्पिटल्स कोरोना चाचणीसाठी गोरगरिबांची व सामान्य नागरिकांची लुटमार करत आहेत. अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स कोरोना चाचणीसाठी 1000-1500 रुपये रुग्णांकडून घेत आहे. राज्य सरकारने निश्चित केलेले दरा पेक्षा हे अधिक दर आहेत. या महामारीमुळं अनेक जण बेरोजगार झाले आहेत. तसेच व्यापारीही त्रस्त झालेला आहे.हॉस्पिटलमध्ये सध्या बेड देखील लवकर भेटत नाही. त्यामुळं अनेक जणांना उपचार भेटतही नाही. या महामारी  मुळे अनेक लोकांवर आर्थिक संकट आलेला आहे. त्यामुळे हॉस्पिटल्सनी करोना चाचणीसाठी व उपचारासाठी सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेऊ नाही. रूग्णांना कुठेही वाटले की तुमच्याकडून जास्त पैसे घेण्यात येत आहेत .तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय िंकंवा आपल्या स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,  पंचायत समिती सदस्य आमदार, खासदार यांना कळवावे तसेच सर्व राजकीय पक्षांनी या काळात सर्वसामान्यां उपचार व हॉस्पिटलमध्ये बेड मिळेल यासाठी मदत करावी कारण  सध्याची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे आणि राजकीय लोकांनी मदतीसाठी पुढे आलं पाहिजे सहकार्य करण्यासाठी.


राज्यात कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचे दर

  500 ते 800 रुपये

- रुग्णाने लॅबमध्ये जाऊन टेस्ट केली तर 500 रुपये

- लॅबने तपासणी केंद्रावरून नमुने जमा केल्यास 600 रुपये

- आणि रुग्णाच्या घरी जाऊन चाचणी केल्यास  800  कोरोना


राज्यात कोरोनाच्या रॅपिड अँटीजेन टेस्टचे दर

150 ते 300 रुपये

- रुग्णाने लॅबमध्ये जाऊन टेस्ट केली तर 150 रुपये

- लॅबने तपासणी केंद्रावरून नमुने जमा केल्यास  200 रुपये

- आणि रुग्णाच्या घरी जाऊन चाचणी केल्यास  300  कोरोना


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post