तर फायजरच्या ‘या’ एका गोळीने करोनापासून मुक्ती मिळेल...

तर फायजरच्या ‘या’ एका गोळीने करोनापासून मुक्ती मिळेल...

 


कोविडपासून बचावासाठी लस तयार करणारी कंपनी फायजर (pfizer) ने आता संक्रमित लोकांच्या उपचारासाठी औषधही तयार केलं आहे. त्यांनी केवळ एका गोळीने उपचार होणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, याचा फायदा भविष्यात होणार आहे. सध्या या औषधाचं नाव PF-07321332 असं देण्यात आलं आहे. या औषधाची सध्या क्लीनिकल ट्रायल सुरू आहे आणि जर हे ट्रायल यशस्वी झालं तर घरीच लोक बरे होतील. त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, सध्या या औषधाची फेज १ ट्रायल अमेरिका आणि बेल्जिअममध्ये सुरू आहे. ट्रायलमध्ये १८ ते ६० वयोगटातील ६० लोकांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत या औषधाचं ट्रायल प्राण्यांवर झालं आहे. ज्यातून कोणत्याही प्रकारची रिस्क समोर आली नसल्याचा कंपनीने दावा केलाय. फायजरचं म्हणणं आहे की, या औषधाने SARS-CoV-2 शिवाय इतर कोरोना व्हायरसवरही प्रभाव आढळून आला. अशात भविष्यात जर कोरोना व्हायरसचं नवं रूप आलं तर त्यावरही हे औषध प्रभावी ठरेल. कंपनीने सांगितलं की, पहिल्या टप्प्यात मोजक्याच निरोगी लोकांवर या औषधाचं ट्रायल केली जात आहे. कारण आता हे बघायचं आहे की, मानवी शरीर हे औषध किती सहन करू शकतं. जर सगळं काही बरोबर झालं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जास्त लोकांवर ट्रायल केली जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post