ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन मुंबई : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड  यांचं निधन झालं. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते. एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी १०.०० वाजता त्यांचं  निधन झाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post