नगर शहरात आजही मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्ज.... जिल्ह्यात 'इतक्या' हजार रूग्णांना डिस्चार्ज

नगर शहरात आजही मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्ज.... जिल्ह्यात 'इतक्या' हजार रूग्णांना डिस्चार्जदिनांक १५ एप्रिल, २०२१

आज १८८५ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३०९७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६६ टक्के

अहमदनगर: जिल्ह्यात आज १८८५ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८ हजार १०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३०९७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६६९४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८७१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८२९ आणि अँटीजेन चाचणीत १३९७ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६१, अकोले ३०, जामखेड ३२, कर्जत ४३, कोपरगाव ४०, नगर ग्रामीण ५०, नेवासा १६, पारनेर ३७, पाथर्डी ६२, राहता ८४, राहुरी ०६, संगमनेर ८२,  शेवगाव ४१, श्रीगोंदा २७, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट बोर्ड २७, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२३, अकोले ५१, जामखेड ३४, कर्जत १६, कोपरगाव १६, नगर ग्रामीण २३, नेवासा २८,  पारनेर २८, पाथर्डी ०८, राहाता १०८,  राहुरी २३, संगमनेर १४७, शेवगाव ०५, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर ६२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०७, इतर जिल्हा १४ आणि इतर राज्य ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १३९७ जण बाधित आढळुन आले. मनपा १९१, अकोले ६६, जामखेड १३, कर्जत १३१, कोपरगाव १२१, नगर ग्रामीण ९६, नेवासा ९०, पारनेर ६८, पाथर्डी १२५,  राहाता १६०, राहुरी ७८, संगमनेर ३८, शेवगाव ६८, श्रीगोंदा ४७, श्रीरामपूर ८२, कॅन्टोन्मेंट बोर्ड १२ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ३९७, अकोले १४०, जामखेड ३७, कर्जत २०८,  कोपरगाव ७८, नगर ग्रामीण १५२, नेवासा ४७, पारनेर ५३, पाथर्डी ८२, राहाता ७१, राहुरी ११२, संगमनेर २२४,  शेवगाव ८७,  श्रीगोंदा १८,  श्रीरामपूर ७१, कॅन्टोन्मेंट ५६, मिलिटरी हॉस्पिटल ०६, इतर जिल्हा ४४ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:१,०८,१०६

उपचार सुरू असलेले रूग्ण:१६६९४

मृत्यू:१४०१

एकूण रूग्ण संख्या:१,२६,२०१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post