दातीर खून प्रकरणातील फरार आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक

 राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे खूनाच्या गुन्ह्यातील  फरार आरोपी अक्षय कुलथे  यास उत्तर प्रदेश मधून अटक

 Dysp संदीप मिटके यांचे  पथकाची परराज्यात जाऊन धडाकेबाज कामगिरी



राहुरी येथील  पत्रकार   रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी(वय 25 वर्ष राहणार जुने बस स्टँड जवळ एकलव्य वसाहत राहुरी) व तोफिक मुक्तार शेख (वय 21 वर्ष राहणार राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच सदर  गुन्हा Dysp. संदीप मिटके यांचेकडे वर्ग होताच गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे  Ì(वय 46)  यास नगर औरंगाबाद  जाणारे रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त  येथून  अटक केली होती. परंतु अक्षय कुलथे हा फरार होता. Dyspसंदीप मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता.  बीनंदनकी  जिल्हा  फत्तेपूर   येथून शिताफीने अटक करून additional civil judge/ Judicial magistrate court no 4 Fatehpur Uttar Pradesh यांच्या समक्ष हजर केले असता आरोपीस 72 तासांची Transit remand custody देण्यात आली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post