पत्रकाराच्या खूनप्रकरणी आणखी एक आरोपी अटकेत

पत्रकाराच्या खूनप्रकरणी आणखी एक आरोपी अटकेतनगर - राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातिर अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी लाल्या उर्फ अजून माळी या आरोपीला अटक केल्यानंतर शुक्रवार दुपारी तौफिक शेख या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दातीर हत्या प्रकरणी राहूरी पोलिसांनी दोन आरोपी ताब्यात घेतल्यामुळे नवनियुक्त पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.राहूरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती.शहरातील रोटरी ब्लड बॅक जवळील रामदास पोपळघट यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लाॅटमध्ये त्यांचा आढळून आला. राहूरी पोलिसांनी बुधवारी म्हैसगाव परिसरात लाल्या उर्फ अर्जुन माळी याला पकडून गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ कार पोलिसांनी हस्तगत केली होती. दरम्यान या हत्या प्रकरणातील आरोपी तौफिक मुख्तार शेख यास नाशिक जिल्ह्यातील विंचूर(तालुका.निफाड) येथून स्थानिक गुन्हे अन्वेशन व राहूरी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post