पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे जेरबंद

 पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू मोरे जेरबंदजिल्ह्यात गाजत असलेल्या पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार कान्हू गंगाराम मोरे यास अखेर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. घटनेच्या तेराव्या दिवशी मुख्य आरोपी हाती लागल्याने खून प्रकरणाचे मुख्य कारण समोर येणार आहे. नेवासा हद्दीत सदरची कारवाई झाली

राहुरी शहरातील दक्षपत्रकार संघटनेचे प्रमुख रोहिदास दातीर यांची ६ एप्रिल रोजी अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना जेरबंद केलं होतं त्यातील मुख्य आरोपी कान्हू  मोरे व अक्षय कुलथे हे गेले तेरा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. सदर हत्या प्रकरण मात्र राज्यामध्ये गाजत होतं. माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे यांनी सदर पीडित कुटुंबियांची भेट घेऊन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर गंभीर आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी देखील केली होती. आरोपांबाबत सविस्तर उत्तरे देत राज्यमंत्री तनपुरे यांनी घटनेतील गुन्हेगार लवकरच गजाआड होतील व आरोपींना कठोर स शिक्षा न्याय यंत्रणेद्वारे केली जाईल असे स्पष्ट केले होते. 

दरम्यान,  राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस हे देखील दातीर कुटुंबियांची  भेट देण्यासाठी येणार अशी चर्चा होती. त्यामुळे दातीर खून प्रकरण चांगलेच तापले होते. नुकतेच  हत्या प्रकरणाचा तपास देखील राहुरी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याकडून काढत डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केला होता.आज रविवारी  यातील मुख्य आरोपी कान्हू मोरे हा नेवासा भागात दडुन बसला असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती.रविवारी राञी मोरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.त्यामुळे आता हत्या नेमकी कुठल्या कारणातून झाली  हे पोलिस तपासात स्पष्ट होणार आहे.सदरची कारवाई  जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक  संदीप मिटके , सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, स फौ. राजेंद्र  आरोळे,  सुरेश  औटी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, रवींद्र मेढे, नितीन शिरसाठ यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post