दारू विक्रीला विरोध केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

दारू विक्रीला विरोध केल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्ननगर –   प्लॉटवर दारूविक्री करण्यास विरोध केल्या आणि याबाबत पोलिसांना माहिती दिल्याच्या कारणावरून सहा जणांनी गज लाकडी दांडक्याने एकाला मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबद्दल मिळालेली माहिती अशी की दी. 28 एप्रिल मंगळवारी सायंकाळी नागापूर एमआयडीसीतील तारा पान जवळ ही घटना घडली आहे या मारहाणीत रवींद्र वामन सुपेकर (वय 50 रा. झोपडी कॅन्टीन अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रेम भाकरे, कुबड्या दशरथ पालवे आणि इतर चार अनोळखी  इसमांविरुद्ध खुनाचा प्रयत्न कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज  आठरे करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post