करोनाचा मेगा संडे.... आजही इतक्या हजार नवीन बाधितांची भर

 करोनाचा मेगा संडे.... आजही इतक्या हजार नवीन बाधितांची भर
 नगर : मिनी लॉकडाउनच्या निर्बंधानंतरही करोनाचा प्रादुर्भाव थांबण्यास तयार नसून आज पुन्हा नगर जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत.  नगर  जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 414 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण संख्या आढळली आहे. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आहे. नगर शहरात पाचशेच्या पुढे रुग्णसंख्या गेली. नगर शहरात 531 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यात दोनशेच्या पुढे, तर काेपरगाव, अकाेले, पारनेर, कर्जत, राहुरी, नगर तालुक्यातील रुग्णांची संख्या शंभरच्या पुढे गेली आहे. अहमदनगर शहर 531, राहाता 281, संगमनेर 70, श्रीरामपूर 243, नेवासे 65, नगर तालुका 198, पाथर्डी 59, अकाेले 171, काेपरगाव 110, कर्जत 135, पारनेर 137, राहुरी 154, भिंगार शहर 87, शेवगाव 71, जामखेड 49, श्रीगाेंदे 43, इतर जिल्ह्यातील 04आणि मिलिटरी हॉस्पिटल 06 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 902, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 412 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1100 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post