मिनी लॉकडाऊननंतर नगर शहरात आता कंटनमेंट झोन, सावेडीतील ‘हा’ परिसर सील

 


मिनी लॉकडाऊननंतर नगर शहरात आता कंटनमेंट झोननगर - शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मंगळवारी 623 नवे रुग्ण आढळून आले. सावेडी उपनगरातील रासनेनगर परिसरात एका दिवसात 13 रुग्ण आढळून आल्याने हा परिसर कंन्टन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागावर सोपविली आहे. शहरातील आणखी काही ठिकाणी कंटेनमेंट करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. केडगाव येथील शाहूनगर परिसर कंटेनमेंट करण्यात आला आहे.केडगाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनल्याने या भागातील कंटेनमेंट झोनची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post