काँग्रेसचे जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात आंदोलन

 महाराष्ट्राला पुरेशा लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे जिल्हा शासकीय रुग्णालय आवारात आंदोलन ,

महाराष्ट्राला एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव ; काँग्रेसचा आरोप प्रतिनिधी : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. अशा संकट काळात महाराष्ट्राला एकाकी पाडत कोंडी करण्याचा डाव भाजप करीत असल्याचा आरोप अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.

महाराष्ट्राला पुरेशा लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, विद्यार्थी नेते जाहीद शेख, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, आदित्य यादव आदी सहभागी झाले होते. 

यावेळी बोलताना अक्षय कुलट म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्राला पुरेशा लस उपलब्ध करून द्याव्यात यासाठी राज्यव्यापी आंदोलन पक्षाच्यावतीने सुरू केले आहे. त्याच माध्यमातून आज नगर शहरामध्ये जिल्ह्यातील नागरिकांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. 

यावेळी केंद्र सरकारच्या वतीने ११ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा करण्याच्या करण्यात येत असलेल्या लसीकरण महोत्सवाचा निषेध करण्यात आल. जिथे लसच उपलब्ध नाही तिथे लसीकरणाचा महोत्सव कसा काय साजरा होऊ शकतो, असा सवाल यावेळी काँग्रेसच्या वतीने उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्राला लस लवकरात लवकर पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली नाही तर आगामी काळात काँग्रेसच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post