नगरकरांचा लॉकडाऊनला प्रतिसाद...शहरात रस्ते ओस, सर्वत्र सामसूम

 नगरकरांचा लॉकडाऊनला प्रतिसाद...शहरात रस्ते ओस, सर्वत्र सामसूम
नगर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत नगरमध्ये कडक  लॉकडाऊन करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासूनच संचारबंदी लागू झाली असून प्रमुख चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात आहे. शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावरील गर्दी पूर्ण गायब झाल्याचे दिसून आले. चितळे रोड, दिल्लीगेट, माळीवाडा, कापडबाजार, सर्जेपुरा, सावेडी रोड, पाईपलाईन रोड, गुलमोहोर रोड आदी परिसरात मेडिकल, दूध डेअरी वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. चौकांमध्ये पोलिस तैनात असून येणार्‍या जाणार्‍यांची चौकशी करूनच त्यांना सोडण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदी असली तरी लसीकरणासाठी तसेच वेद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडणारांना मुभा देण्यात आली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांनाही परवानगी देण्यात आलेली आहे. लॉकडाउनमुळे नगरकरांना शनिवारी तसेच रविवारीही बाहेर फिरण्याच्या सवयीला ब्रेक लावावा लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगरकरांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post