बँकेची परिक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेलेल्या नगर जिल्ह्यातील तरूणाची हत्या

बँकेची परिक्षा देण्यासाठी औरंगाबादला गेलेल्या नगर जिल्ह्यातील तरूणाची हत्या


 

 भारतीय रिझर्व्ह बॅंकेची लिपीक पदाची परिक्षा देण्यासाठी औरंगाबादला आलेल्या विकास देवीचंद चव्हाण (२३, ऱा. पाथर्डी, जि. अहमदनगर) या तरुणाला कब्रस्तानात नेउन त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी विकास चा एक  कोपरापासून एक हात धडावेगळाकरून सोबत नेला अथवा कुठेतरी फेकून दिला असे चित्र घटनास्थळी होते.  ही घटना शुक्रवारी सकाळी ७  वाजता उघडकीस आली . 

नगर जिल्ह्यातून रिझर्व्ह बँकेच्या परीक्षेसाठी विकास गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये आला होता. आज सकाळी महापालिका कार्यालयामागील कब्रस्तानातमध्ये त्याचा खून केलेल्या अवस्थेत प्रेत आढळुन आले. विशेष म्हणजे आज ८ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती. या युवकाचा एक हात कोपरापासून तोडलेला असून तो गायब आहे. शिवाय त्याच्या गळा कापण्यात आला आणि छातीत चाकू खुपसण्यात आल्याचे समोर आले . माहिती  मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहाय्यक आयुक्त  हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक, अविनाश आघाव , संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post