अहमदनगर केमिस्ट असोशिएशन कडून आरोळे कोविड सेंटर ला औषधांची मदत..जामखेड येथील Dr आरोळे दाम्पत्यांच्या रुगसेवेतुन, आणि लोकसहभागातून चालवले जाणारे आरोळे कोविड सेंटरच्या कार्याला प्रेरित होऊन, आज रोजी नगर येथील फर्मा, एजन्सीज आणि मेडिकल  रिप्रेझेन्टेटिव्ह च्या माध्यमातून मदत करण्यात आली.

 साधारणतः तीन लाख रु बाजारमूल्य किमतीची, कोविड रूग्णांना उपचारात लागणारी सर्वप्रकारची औषधे, संस्कृती फार्मासयुटिकलस् चे  मा.श्री. सुरेंद्रकुमार बोराडे व 

मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मा.श्री. सुचीतजी शिंदे यांच्या पुढाकाराने, अहमदनगर केमिस्ट असोशिएशन व 

MSMRA (Maharashtra State Medical Representative Association) याच्या सहकार्याने औषधांचा साठा, आरोळे कोविड सेंटर चे संचालक Dr रविदादा आरोळे यांना सुपूर्त करण्यात आला.

 यावेळी बोलताना , आम्ही आमच्या असोशिएशन आणि MR च्या माध्यमातून पुढील वेळी जास्तीस्त जास्त मदत देण्याची भावना संस्कृती फार्मा. चे श्री सुरेंद्र बोराडे यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी बोलताना रविदादा यांनी

औषधांची मदत केल्याबद्दल.

१) काकडे फार्मा २) तिरुपती मेडिकल ३) वर्धमान एजन्सी ४) शेजल एजन्सी ५) माऊली फार्मा

६) अथरव एजन्सी ७) विशाल एजन्सी ८) सागर एजन्सी ९) झालानी एजन्सी १०) संस्कृती एजन्सी, यां सर्वांचे मनस्वी धन्यवाद व्यक्त केले.

या वेळी उपस्थित, dr रविदादा आरोळे व त्यांचा स्टाफ, तसेच संस्कृती फ्रार्मा चे सुरेंद्रकुमार बोराडे, M.R. सूचित शिंदे. डॉ. देवेंद्र बोराडे. सुनील जगताप आदी..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post