‘एमआयडीसी’च्या कारभारामुळे नागरिक, शेतकरी हवालदिल, आंदोलनाचा इशारा

 एमआयडीसी कार्यालयाच्‍या  चुकीच्‍या धोरणामुळे नागरिकांना व शेतक-यांना त्रास – माजी नगरसेवक दत्‍ता पाटील सप्रेनगर - नागापूर मनपाच्‍या हद्दीमधून एमआयआरसीची  पिण्‍याच्‍या पाईप लाईनचे काम चालू असून हे काम करताना ठेकेदाराकडून मनपाचे मोठया प्रमाणात नुकसान करित आहेत असे आढळून आले आहे. सदर ठेकेदार सिमेंट कॉक्रीटचे रस्‍ते जेसीबी यंत्राच्‍या सहाय्याने उखडीत असून मनपाच्‍या अंतर्गत पिण्‍याच्‍या पाण्‍याची लाईन ,ड्रेनेजची लाईन तुटल्‍या जात असल्‍यामुळे नगर मनमाड रोड वरील नागरिकांच्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मोठया प्रमाणात नागरिक तक्रार करून ही याकडे ठेकेदार दुर्लक्ष करित असून पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या पाईप लाईन दुरूस्‍तीचे काम हाती घेत नाहीत. याच बरोबर बंद पाईप गटरीचे  काम ही नादुरूस्‍त केल्‍यामुळे मैलामिश्रीत पाणी रस्‍त्‍यावर पसल्‍यामुळे दुर्गधी पसरली आहे. तरी ठेकेदाराकडून मनपाच्‍या हद्दीतील पाईप लाईन दुरूस्‍तीच्‍या कामाचे आदेश देण्‍यात यावेत अशी मागणी एमआयडीसी चे उपअभियंता  गणेश वाघ यांचेकडे माजी नगरसेवक दत्‍ता पाटील सप्रे यांनी केली.

      तसेच पावसाळयापूर्वी एमआयडीसी परिसरातील एल व एम ब्‍लॉक मधील पावसाळी पाण्‍याची विल्‍हेवाट लावावी हे पाणी शेट सिना नदीपर्यत सोडण्‍याची व्‍यवस्‍था करावी जेणे करून बोल्‍हेगांव फाटा, गणेश चौक, काकासाहेब म्‍हस्‍के परिसरामध्‍ये नागरिकांची मोठी लोकवस्‍ती आहे. पावसाळयामध्‍ये या भागातील नागरिकांच्‍या घरामध्‍ये अक्षरक्षा मोठया प्रमाणात पाणी साठले जाते. दरवर्षी या परिसरामध्‍ये नागरिक पावसाच्‍या पाण्‍याला कंटाळले असून मोठे आर्थिक नुकसान भोगावे लागत आहे; तरी एमआयडीसी कार्यालयाने उपाय योजना कराव्‍यात अन्‍यथा नागापूर, बोल्‍हेगांव परिसरातील नागरिक तीव्र स्‍वरूपाचे आंदोलन करतील.

      एमआयडीसी कार्यालयाने चुकीचे ओढे नाले दर्शवून शेतक-यांच्‍या शेतात बेकायदेशीरपणे केमिकल युक्‍त पाणी सोडले आहे. या भागातील शेतक-यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले असून त्‍यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अन्‍यथा याभागातील शेतकरी एमआयडीसी कार्यालया समोर उपोषण करतील. असा इशारा नगर‍सेविका कमलताई सप्रे,  अशोक बडे,  मदन आढाव, रिताताई भाकरे यांनी दिला. यावेळी भालचंद्र भाकरे, सतिष नेहुल आदी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post