स्वस्तात गोडे तेल देण्याचं आमिष दाखवून लुटणारे गजाआड

 स्वस्तात गोडे तेल देण्याचं आमिष दाखवून लुटणारे गजाआडनगर :  स्वस्तात सोने देण्याच्या अमिषाने लुट करणार्‍या टोळीने आता स्वस्तात गोडतेल देण्याचे अमिष दाखवून लुटीचा धंदा सुरू केला आहे.

अशाच एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. सोलापूरच्या एकाला नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात या टोळीने दोन दिवसापूर्वी स्वस्तात गोडतेलाचे डबे देण्याचे अमिष दाखवून बोलून घेत त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल असा 76 हजारांचा मुद्देमाल लुटला होता.

राहुल नेवाशा भोसले (वय 22), उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय 33 दोघे रा. वाकळी ता. नगर), दगू बडोद भोसले (वय 27 रा. पढेगाव ता. कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत.


आरोपींनी हर्षल शिवशंकर चौधरी (रा. अकलुज ता. माळशिरज जि. सोलापूर) यांना स्वस्तात गोडतेलाचे डबे देतो म्हणून घोसपुरी शिवारात बोलून घेतले होते. चौधरी यांनी स्वस्तात गोडतेल घेण्यासाठी सोबत पैसे आणले होते. फिर्यादी येताच आरोपींनी त्यांना दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देत 60 हजाराची रक्कम व दोन मोबाईल बळजबरीने काढून घेतला होता. चौधरी यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुप्त खबर्‍यामार्फत आरोपींचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केेली आहे. एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, सहायक निरीक्षक मिथून घुगे, नगर तालुक्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post