प्रत्‍येक गांवात लसीकरण केंद्र सुरू करावे - माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले

 राहुरी मतदार संघातील प्रत्‍येक गांवात लसीकरण केंद्र सुरू करावे


राज्‍य सरकार गोंधळलेल्‍या अवस्‍थेत आहे – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले


 प्रत्‍येक गांवात लसीकरण केंद्र सुरू करावे - माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले



नगर – कोरोना संसर्ग विषाणूने नगर जिल्‍हा धोकादायक वळणावर पोहोचत असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण पसरले आहे.  जिल्‍हा प्रशासनाने आरोग्‍य संदर्भातील जलद गतीने विविध उपाय योजना कराव्‍यात. राहुरी मतदार संघातील नगर तालुका, पाथर्डी तालुका व राहुरी तालुक्‍यामधील प्रत्‍येक गांवात लसीकरण केंद्र सुरू करावेत जेणे करून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तालुक्‍यातील मोठमोठया बाजारपेठांच्‍या गांवामध्‍ये कोरोना सेंटर व चाचणी केंद्र सुरू करावेत. दिवसे दिवस मृत्‍युचे प्रमाण वाढत असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये भिती पसरली आहे. प्रशासनावरती या सरकारचा कोणताही धाक नाही. तीन पक्षाचे सरकार मधील मंत्र्याचा गोंधळ चव्‍हाटयावर येत असल्‍यामुळे हे सरकार अस्‍वस्‍थ झाले आहे. एकामागून एक मंत्र्यांना आपल्‍या पराक्रमामुळे राजीनामा देण्‍याची वेळ येत आहे. त्‍यामुळे हे सरकार गोंधळलेल्‍या अवस्‍थेत असल्‍यामुळे कोरोना संदर्भात उपाय योजना करण्‍यास वेळ लागत असल्‍याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांनी केले.

      नगर तालुक्‍यातील बु-हाणनगर येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रास भेट देवून माजी मंत्री शिवाजीरा कर्डिले यांनी माहिती घेतली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती संतोष म्‍हस्‍के, खरेदी विक्री संघाचे सुरेश सुभे, हरिभाऊ कर्डिले, बाबासाहेब खडसे, बन्‍सी कराळे, रभाजी सुळ, रावसाहेब कर्डिले, रेवण चोभे आदी उपस्थित होते.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post