करोनाने यंत्रणा कोलमडली...नगरमध्ये अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठीही मोठे वेटिंग...

करोनाने यंत्रणा कोलमडली...नगरमध्ये अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठीही मोठे वेटिंग...



नगर:करोना बाधितांचा आकडा वाढत असताना  आरोग्य यंत्रणेसोबतच अमरधाममधील अंत्यविधी करणारी यंत्रणाही कोलमडली आहे. महापालिकेकडे एकच शववाहिनी असल्याने एकाचवेळी अनेक मृतदेह कोंबून नेले जात आहेत. तर विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.  काल रात्री नगर शहरातील अंत्यसंस्काराचे विदारक चित्र समोर आले. एका शववाहिकेत सहा मृतदेह एकावर एक ठेवून नेण्यात आले. महापालिकेची यासंबंधीच यंत्रणा अपुरी असल्याने ही वेळ आल्याचे कर्मचारी सांगतात. नगरच्या रुग्णालयांत शहरासोबतच ग्रामीण भागातील रुग्णही दाखल होतात. त्यांचा मृत्यू झाल्यावर नियमाप्रमाणे मृतदेहांवर येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतात. यासाठी नगरच्या अमरधाममधील विद्युत दाहिनीचा वापर केला जातो. मात्र, तेथे दिवसाला केवळ २० अंत्यसंस्कार होऊ शकत आहेत. त्यासाठी नातेवाकाईंना तासंतास प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने अंत्यस्कार करण्यासही सुरुवात झाली आहे. त्यासाठी ओटे अपुरे पडत असल्याने जमिनीवरच सरण रचून अंत्यसंस्कार केले जात आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post