केंद्राकडून मिळणारा लसीचा साठा खासगी रूग्णालयांना नाही, राज्य सरकारचा निर्णय

केंद्राकडून मिळणारा लसीचा साठा खासगी रूग्णालयांना नाही, राज्य सरकारचा निर्णय मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मात्र सध्या राज्यात लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करतानाही अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे केंद्र सरकारकडून मिळणारा लसींचा साठा केवळ शासकीय रुग्णालय आणि लसीकरण केंद्रांवरच वापरला जाईल. या लसींचा साठा खासगी रुग्णालयांना करण्यात येणार नाही. राज्यात लसींचा तुटवडा जाणवत असल्यानं ठाकरे सरकारनं आता खासगी रुग्णालयांना लसींचा साठा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांना थेट लस उत्पादकांकडून लसींचा साठा खरेदी करावा लागेल. तशी माहिती राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आली आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. यासोबतच खासगी रुग्णालयांकडे असलेला कोरोना लसींचा अतिरिक्त साठादेखील राज्य सरकार परत घेण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post