पारनेर बाजार समितीचे काम कौतुकास्पद - मा. ना. बाळासाहेब थोरात

 पारनेर बाजार समितीचे काम कौतुकास्पद - मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात


 पारनेर तालुक्यातील कोरोना आढावा बैठकी निमित्त महसूल मंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात हे तालुक्यात आले असताना, त्यांनी पारनेर बाजार समिती सदिच्छा भेट दिली त्या प्रसंगी त्यांचा सभापती प्रशांत गायकवाड यांनी त्यांच्या शेतातील सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेवगा भेट देऊन नामदार साहेबांचे स्वागत केले. त्यावेळेस बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना व विकास कामांची माहिती सभापतींनी नामदार साहेबांना दिली गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीने काटकसरीने कामकाज करून बाजार समितीस 2 कोटी 50 लाख उत्पन्न झालेले असून बाजार समितीस 1 कोटी 18 लाख नफा झालेला आहे बाजार समिती यावर्षी नफ्यातून कोरोना लसीकरण व इतर उपाययोजनेसाठी रु 2 लाख खर्च करणार आहे बाजार समितीमध्ये सध्या बाजार आवाराचे काँक्रिटीकरण नवीन दोन ओपन शेड चे काम चालू आहे तसेच यापुढेही शेतकऱ्यांसाठी विविध योजना बाजार समितीमार्फत राबविण्यात येणार आहेत असे सभापतींनी सांगितले त्यावर मा. नामदार साहेबांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन कोरोना काळ अत्यंत कठीण असून प्रत्येकाने अतिशय जबाबदारीने वागावे बाजार आवारात शेतकऱ्यांना विविध अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशा सूचना दिल्या तसेच लवकरात लवकर शासन आदेशाप्रमाणे बाजारातील घटकांना लसीकरण करण्यात यावे असे सांगितले यावेळी मा. आ. श्री. डॉ. सुधीरजी तांबे व मा. आ. श्री. निलेशजी लंके, ज्येष्ठ संचालक मा. सभापती काशिनाथ दाते सर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के सर, संचालक श्री सावकार बुचडे व इतर संचालक मंडळी व्यापारी प्रतिनिधी, जिल्हा सहकारी बँकेचे प्रतिनिधी, कर्मचारी, वि.का. सेवा. सोसायटी चे प्रतिनिधी तालुक्यातील सर्व पत्रकार व बाजार समिती कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post