विमा असूनही रूग्णालयांनी कॅशलेस सुविधा नाकारल्यास तक्रार करा

विमा असूनही रूग्णालयांनी कॅशलेस सुविधा नाकारल्यास तक्रार करा 



नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना, त्यावर उपचार घेणंही महाग ठरत आहे. अशात विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आयआरडीएआय (IRDAI) ने विमा कंपन्यांना कोरोना रुग्णांना कॅशलेश इलाजासाठी सुविधा देण्याचं सांगितलं आहे. अनेक रुग्णालयं पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीअंतर्गत कॅशलेश उपचार मिळवण्यास पात्र असलेल्या कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी कॅशलेश सुविधा देत नाहीत. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत आहेत. जर तुमच्या नातेवाईक किंवा मित्रांसह असं काही होत असल्यास, याची तक्रार विमा कंपनी आणि विमा लोकपाल अधिकारी यांच्याकडे तक्रार करू शकतात.

तक्रार करायची असल्यास, तक्रार नोंदणी फॉर्म IRDAI वेबसाईटवरुन (http://www.policyholder.gov.in/Report.aspx#) डाउनलोड करावा लागेल. या फॉर्ममध्ये तक्रारीचा तपशील भरुन, तक्रार IRDAI च्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन किंवा ऑफलाईन करता येईल.

अशाप्रकारे दाखल करता येईल तक्रार -

- IRDAI च्या कंज्यूमर रिड्रॅसल डिपार्टमेंटच्या टोल फ्री नंबर 155255 किंवा 1800 4254 732 वर कॉल करुन तक्रार दाखल करता येऊ शकते.

- आवश्यक कागदपत्रांसह Complaints@irdai.gov.in वर मेल करुन तक्रार करू शकता.

- IRDAI च्या पोर्टलवरुनही तक्रार दाखल करता येऊ शकते. यासाठी आपली तक्रार igms.irda.gov.in वर दाखल करुन मॉनिटर करू शकता

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post