जिल्ह्यात ‘इतक्या’ हजार नवीन बाधितांची भर



नगर- राज्यात ब्रेक द चेन सुरू झाली असली तरी  नगर जिल्ह्यात करोना अनब्रेक झाला आहे. गेल्या वर्षभरातील सर्वाधिक आणि धडकी भरवणारी रुग्णवाढ मागील २४ तासात झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 3280 नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक 730 रूग्ण ‌नगर शहरात आढळून आले आहेत. 

नगर मनपा 887, राहाता 280, संगमनेर 184, पाथर्डी 98, कर्जत 236, कोपरगाव 152, नगर ग्रामीण 341, श्रीरामपूर 189, अकोले 137,  नेवासा 95, पारनेर 101, शेवगाव 164, राहुरी 186, श्रीगोंदा 46, जामखेड 48,  भिंगार छावणी मंडळ  68, इतर जिल्हा 55, मिलिटरी हॉस्पिटल 13, इतर राज्य 00, असे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅब मध्ये 798, खाजगी लॅब मध्ये 808, तर ॲंटीजेन टेस्टमध्ये 1674 बाधित आढळून आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post