8 महिन्याच्या मुलासह आईची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

8 महिन्याच्या मुलासह आईची विहीरीत उडी घेवून आत्महत्या


नगर : जामखेड शहरातील चुंबळी येथील विवाहित महिलेने आठ महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत जामखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.   चुंबळी येथील ईश्वर हुलगुंडे याचा पाथर्डी तालुक्यातील खोपटी गावातील राधा हिच्याबरोबर दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना आठ महिन्याचा राम नावाचा मुलगा आहे. घरगुती वादातून रागाच्या भरात मंगळवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता राधा ईश्वर हुलगुंडे (वय २२) हिने आठ महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

याबाबत जामखेड पोलिसांना पीडित मुलीचे सासरे बारीकराव हुलगुंडे यांनी खबर दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मयत महिला राधा व आठ महिन्याचा मुलगा राम यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. मयत मुलीच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली. अंत्यविधी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची ग्वाही पोलिसांनी दिल्यानंतर शवविच्छेदनानंतर रात्री आठच्या सुमारास मायलेकाचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post