'रेमडेसिवीर'तुटवड्यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने महसूलमंत्री थोरात यांना भर बैठकीत विचारला सवाल

रेमडेसिवीर तुटवड्यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने महसूलमंत्री थोरात यांना भर बैठकीत विचारला सवाल नगर :  राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना आढावा बैठकीतच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अकोले तालुक्यात कोरोना आढावा बैठक बोलावली होती.  अकोले तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.  यावेळी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी थेट बाळासाहेब थोरात यांनाच जाब विचारला.  'रेमडेसीवीर इंजेक्शन अकोले तालुक्याला का कमी मिळतात असा अन्याय का? असा सवालच मालुंजकर यांनी उपस्थितीत केला.

'तालुक्यात इतकी बिकट अवस्था आहे, नीट आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाही', असं म्हणत तक्रारीचा पाढाच मालुंजकर यांनी वाचला. त्यामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. बैठकीतील इतर कार्यकर्त्यांनी मालुंजकर यांना खाली बसण्यास सांगितले. पण, तरीही मालुंजकर प्रश्न विचारतच होते.

त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी 'आम्हाला वेदना समजत नाही का? माणूस एकूण घेतो म्हणजे कसं ही बोलायचं हे योग्य नाही' असं म्हणत चांगलेच खडेबोल सुनावले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post