कोयत्याने हल्ला करून ट्रक चालकांना लुटले, दोघे जेरबंद

कोयत्याने हल्ला करून ट्रक चालकांना लुटले, दोघे जेरबंदनगर:  मालेगाव येथून बाजरीचे पोते घेऊन दोन मालट्रक कुरकुम, दौंडकडे निघाले होते. कोल्हारजवळ नगर - मनमाड महामार्गावर एका हॉटेलजवळ मालट्रकचा टायर पंक्चर झाला.टायर बदलत असताना कोल्हारकडून ५ अनोळखी चोरट्यांनी हातातील कोयत्याने वार करून ट्रक ड्रायव्हरकडील रोख रक्कम व मोबाईल दरोडा टाकून चोरून नेले.लोणी पोलिसांना खबर मिळताच मोठ्या शिताफीने पाठलाग करून निर्मळ पिंपरी शिवारात २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र उर्वरित तिघा जणांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post