कडूस यांचा पुढाकार....सदगुरू शंकर कोविड टेस्टिंग अँड आयसोलेशन सेंटर

 *सारोळा कासार ग्रामस्थांना विनम्र आवाहन*     कोरोनाच्या ह्या बिकट प्रसंगाला धैर्याने तोंड देणाऱ्या सर्व गावकऱ्यांना सप्रेम नमस्कार. आज काही ह्या कोरोनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यातून सहीसलामत बाहेर आलेत तर काहींनी आपल्या प्रेमाच्या माणसांना गमावलंय. बेड, औषधे आणि ऑक्सिजन साठी लोकांना अक्षरशः जिवाचं रान करावं लागतंय. येणारा प्रत्येक दुसरा फोन हा पेशंटसाठी बेड ची कुठे उपलब्धता होतेय का? असे विचारण्यासाठी असतो. आपल्या जवळच्या व्यक्तीची औषधोपचारांअभावी ढासळत चाललेली तब्येत असहाय्य पणे बघण्याइतके मोठे दुःख नाही.

ना पैसा कामी येतोय, ना राजकीय वजन.

    शहरात राहणाऱ्या किंवा ग्रामीण भागातील सुशिक्षितांचं तरी एकवेळ बरं आहे. त्यांना कमीत कमी कोरोना झाल्यावर पुढे काय करावं, याचं तरी ज्ञान आहे. HR-CT scan करावं, रक्ताच्या चाचण्या कराव्यात, मग ते रिपोर्ट घेऊन एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे जावं इत्यादी. पण ग्रामीण भागातील अशिक्षित माणूस दवाखान्यातली गर्दी पाहून पार गांगरून जातो हो... त्या बिचाऱ्याने कसे तरी ५-१० हजार रुपये जमा करून आणलेले असतात. दवाखाना पाहून त्याला वाटतं, एवढ्यात काय भागायचं नाही. सरकारी दवाखाने फुल्ल. तो तसाच घरी जातो, दुखणं अंगावर काढतो आणि इतरांनाही बाधित करतो..

    यावर पर्याय म्हणून सारोळ्यातील काही सामाजिक जाणिव असलेले तरुण मा. श्री. रविंद्र कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत *गुरू  शंकर कोविड टेस्टिंग अँड आयसोलेशन सेंटर* उभे करत आहेत जे *_संपूर्ण मोफत_* आहे. 

ह्या सेंटरमध्ये 

-मोफत रॅपिड अँटीजन टेस्ट ची सुविधा

-राहण्यासाठी प्रशस्त व स्वछ हॉल

-सात्विक आहार व्यवस्था

-प्रत्येक रुग्णाला कमीत कमी २ वेळा MD Medicine डॉक्टरांची भेट आणि सल्ला

-डॉक्टरांची दररोज व्हिजिट

-सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी औषधे

-आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक व्यवस्था

-प्रत्येक रुग्णासाठी वाफ आणि पिण्यासाठी गरम पाणी

-महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था

-प्राणायाम प्रशिक्षण

-पिण्यासाठी आणि वापरासाठी स्वच्छ पाणी

   आपणा सर्वांना विनंती आहे की, घरात किंवा आपल्या शेजारी लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह रुग्ण ज्यांना डॉक्टरांनी आयसोलेट होण्याचा सल्ला दिलेला आहे. अश्यांना घरी न थांबता सेंटरमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहित करा. जेणेकरून प्रसाराला आळा बसेल आणि सर्व ओळखीचे चेहरे सोबत असल्याने रूग्णालाही मानसिक आधार मिळून त्याला लवकर बरा होण्यासाठी उभारी मिळेल. आपण सर्व मिळून लवकरच गावातून कोरोनाला हद्दपार करू. 

*जय शंकर🙏*


टीप- रुग्णांनी येताना सोबत पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि डॉक्टरांची चिट्ठी आणावी


*गुरू शंकर कोविड टेस्टिंग अँड आयसोलेशन सेंटर,*

*कर्मवीर भाऊराव पाटील विद्या. व कनिष्ठ महाविद्यालय, सारोळा कासार*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post