आतापर्यंत एकही करोना रूग्ण नसलेले आरोग्यसंपन्न गाव

आतापर्यंत एकही करोना रूग्ण नसलेले आरोग्यसंपन्न गाव नांदेड : आत्तापर्यंत कोरोना रुग्न सापडलाच नाही, तर गांवात कोणत्याच बिमारीची लाट नाही. ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही! एवढेच नाही तर गावात कोन्ही आजारी पण नसल्याने अॅबुलन्सचा कर्कश आवाज पण नाही. गांव सुखी व आनंदी आहे.


येथून जवळच असलेलं निवळा (ता. हदगांव) हे गांव या गावची लोकसंख्या १, २४५ गावात सर्व सुखी व समृध्द. या गावात आत्तापर्यंत कोराणाचा संसर्ग झालाच नाही. हे विशेष, ग्रामस्थानी कोरोनाची लागन होऊ द्यायचीच नाही असे ठरविले, व गावात जनजागृती व त्याचे तंतोतंत पालन केले. सुरुवातीस गांव स्वच्छ करुन गावात येणारे रस्ते सिल केले. जमावबंदी केली. कामाशिवाय बाहेर कोणीही यायचे नाही. आलेच तर मास्क लावणे, हाथ नेहमी स्वच्छ धुणे, या नियमाचे सर्वानी तंतोतंत पालन करण्याचे ठरविले. यामुळे या गावात आत्तापर्यंत कोरोनाचा शिरकाव झालाच नाही. गावातील ८० टक्के ग्रामस्थानी लस घेतली. उर्वरीत लवकरच लस घेणार आहेत. गावात सामुहीक कार्यक्रम बंद आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post