गृहमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची वर्णी?

गृहमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची वर्णी?  मुंबई: अनिल देशमुख गृहमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार केला आहे. एकीकडे गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतील बड्या नावांची चर्चा असताना या शर्यतीत अचानक हसन मुश्रीफ यांची एन्ट्री झाली आहे. उच्च न्यायालायने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हसन मुश्रीफ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांचा दावा कितपत खरा ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. टिव्ही 9 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.्‌


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post