खा. सुजय विखे कोविड पेशंट साठी देवदुतच

 खा. सुजय विखे कोविड पेशंट साठी देवदुतच :-शिवाजी पालवेखासदार सुजय दादा विखे पाटील हे अहमदनगर जिल्हातील कोविड पेशंट साठी देवदूत ठरले आहेत. कारण सुजयदादा यांनी गुप्त पद्धीने स्पेशल विमान करून लाखो रूपये खर्च करुन दिल्ली मधुन 10000 रेमडेसीविर इंजेक्शन खरेदी करून तातडीने अहमदनगर जिल्हातील सर्व दवाखान्यात वेळेवर पोहच केले व त्या मुळे अनेक पेशंट ला दिलासा मिळाला प्राण वाचले आहेत. कौतुक करावे तेवढे कमी आहे. कोविड च्या महामारीत मधे सुजय दादा यांनी जे कार्य केले आहे हे फक्त देवदुत करू शकतो. जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर च्या वतिने खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे अभिनंदन. जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन च्या वतिने आव्हान करण्यात येते की मास्क चा वापर करा काळजी घ्या घरीच रहा सुरक्षीत रहा. चांगले कार्य करणारे व्यक्तीचे कौतुक होणे गरजेचे आहे. सुजयदादा चा व्हिडिओ पाहील्यावर दादांची जनतेबद्दल असलेले प्रेम तळमळ दिसुन येते. विखे परिवार समाजसेवेसाठी नेहमीच अग्रेसर असुन सुजयदादांची हि सेवा देशालातील व राज्यातील लोकप्रतिनिधी साठी आदर्श व प्रेरणादायी  आहे.  यावेळी सुजयदादा यांना अहमदनगर जिल्हातील जनतेच्या वतिने तसेच माजी सैनिक व शहीद परिवार च्या वतिने शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी  फौंडेशन चे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब कर्पे, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे,  दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, संतोष मगर, शिवाजी गर्जे, महादेव शिरसाट यांनी अभिनंदन केले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post