पाथर्डीत विनाकारण फिरणार्‍यांची करोना चाचणी...‘इतके’ बाधित आढळले

पाथर्डीत विनाकारण फिरणार्‍यांची करोना चाचणी...‘इतके’ बाधित आढळले पाथर्डी - राज्यात लॉकडाऊन करून अत्यावश्यक दुकानांना वेळ ठरवून दिली  असतांना विनाकारण रस्तावर फिरून गर्दी करणाऱ्या लोकांची पाथर्डीच्या तालुका प्रशासनाने कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला उपचारासाठी भरती करण्यात येत असून निगेटिव्ह व्यक्तीला सुद्धा क्वारंटाईन करण्यात येणार आहे.त्यामुळे फालतू फिरून स्वतःचा व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांनी चांगलाच धसक्क घेतला आहे.

मंगळवारी सकाळी शहरातील प्रमुख चौकात प्रशासनाकडून चांगलीच कारवाई करण्यात आली.वाढती गर्दी पाहता तालुका प्रशासन ऍक्शन मोड मध्य आले आहे.स्व वसंतराव नाईक चौकात चेक पोस्टवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून बेजबाबदार आढळून आलेल्या लोकांची रॅपिड अँटीज कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 25 लोकांची रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली आत दोन रुग्ण कोरूना पॉझिटिव निघाले असून 23 जणांचे पुढील आर टी पी सी आर चाचणी येऊ पर्यत त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

 यावेळी प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर,नायब तहसीलदार पंकज नेवसे,तालुका आरोग्यधिकारी डॉ भगवान दराडे,पालिकेचे मुख्यधिकारी धनंजय कोळेकर,पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे,सहाय्यक पोलिस परमेश्वर जावळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, गुप्तवार्ता शाखेचे भगवान सानप,पोलिस कॉन्स्टेबल संदीप बडे,राहुल खेडकर,पालिकेचे गौरव आदिक ,सोमनाथ गर्जे, लक्ष्मण हाडके,शुभम अस्वर, रवींद्र बर्डे, ज्ञानऊसिंग परदेशी,रशीद शेख,नंदकुमार गोला,जावेद शेख,अशोक दाते पोलिस,आरोग्य,पालिका या विभागातील कर्मचाऱ्यांनी ही मोहिम राबवून कारवाई केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post