वृद्ध महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

वृद्ध महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंदनगर - वृद्ध महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गेल्या दोन वर्षापासून आरोपी फरार होता. एप्रिल 2019 मध्ये शहरातील लालटाकी परिसरात खुनाची घटना घडली होती. सुनील उर्फ डुग्या रघुनाथ शिंदे (वय 29, रा. सिद्धार्थनगर, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

दि. 10 एप्रिल 2019 रोजी लालटाकी येथे किरकोळ कारणावरून वाद होवून फिर्यादी माया शिरसाठ यांच्या सासू बेबी अर्जुन शिरसाठ यांची हत्या करण्यात आली होती. याबाबत शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्यानंतर आरोपी सुनील रघुनाथ शिंदे फरार होता. आरोपी शिंदे सिद्धार्थनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. आरोपी शिंदे याला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत. 

सदरची कारवाई अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधीकारी विशाल ढुमे यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना. संदीप पवार, सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, पोकॉ. कमलेश पाथरुट, चालक पोहेकॉ. बबन बेरड यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post