नगर तालुक्यात ‘या’ गावात होणार कोविड केअर सेंटर

रूग्णवाढीमुळे जेऊरला सुरु होणार कोविड केअर सेंटरनगर : नगर तालुक्यात करोना रूग्णांचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने तालुक्यातही कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी होत आहे. त्यानुसार जेऊर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत शुक्रवारी तहसीलदार उमेश पाटील यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष पाहणी करून चर्चा केली. येथे लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या 14 गावांमध्ये आजपर्यंत 500 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत.  दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. कोविड सेंटर सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार उमेश पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत डॉ. योगेश कर्डिले यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी माजी उपसरपंच बंडू पवार, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, बाबासाहेब मगर, अण्णासाहेब मगर उपस्थित होते. तहसीलदार पाटील यांनी ग्रामपंचायतीकडून सहकार्य मिळाल्यास जेऊर येथे तत्काळ कोविड सेंटर सुरू करण्यात येईल, असे सांगितले. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जेऊर येथील एक विद्यालय ताब्यात घेण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post