पोलिसांचा कत्तलखान्यावर छापा, २४ गोवंश जनावरांची सुटका, सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 अहमदनगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी २,३०,०००/- रुपये किंमतीची कत्तलीसाठी बांधुन ठेवलेल्या २४ गोवंश जातीचे जनावरांची सुटका

 गोवंशीय जातीचे जनावराचे ३०० किलोच ६०,०००/- रु. किंमतीचे गोवंशीय मास असे एकुण २,९०,०००/- रु. किंमतीचा मुददेमाल जप्त 
 दि. २५/०४/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, सपोनि/हेमंत भंगाळे, सपोनि / रणदिवे, पोसई/सतिष शिरसाठ, पोसई/मनोज कचरे,  पोना/हेमंत खंडागळे, पोना/जाधव, पोना/सुजितकुमार सरोदे, पोकी/ मासाळकर, पोकॉ/ सागर द्वारके यांनी मिळुन झेडींगेट परिसरातील गोवंशीय जातीचे जनावरांची ३०० किलो वजनाचे ६०,०००/- रु. किंमतीवे गोवंशीय मास व २४ लहान मोठी २,३०,०००/- रु. किंमतीचे गोवंशीय जातीचे जनावरे कत्तल करण्याकरीता डांबून ठेवलेली असतांना हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर छाप्यातील आरोपींचे नावे १) इसरार ऊर्फ इच्चु मुक्तार कुरेशी (रा. झेंडीगेट, अहमदनगर) २) तबरेज आबीद कुरेशी (रा. कुरेशी मस्जीद शेजारी, झेंडीगेट, अहमदनगर) ३) मुज्जु जानेमीया कुरेशी (रा. झेडीगेट, अहमदनगर) ४) तौफिक युनिस कुरेशी (रा. झेंडीगेट, अहमदनगर) असे सांगितल्याने त्यांचेविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं ०३१३/२०२१ भादंवि कलम २६९.३४ सह महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे कलम ५ क ९. अ. सह प्राणि क्लेश प्रतिबंध अधिनियम १९७६ कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विशाल शरद ढुमे, व कोतवाली पो.स्टे.चे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post