गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत स्वरोहम संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचे यश

 गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत स्वरोहम संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांचे यश
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शास्त्रीय गायन, आणि तबला वादनाच्या परीक्षेत स्वरोहम संगीत अकादमीच्या सर्व विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले अशी माहिती संचालिका अमृता बेडेकर यांनी दिली.

स्वरोहम संगीत अकादमीच्या स्नेहल गुणकी हिने गायनाच्या प्रवेशिका प्रथम परीक्षेत केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर,तन्मय मुळे याने तबला प्रवेशिका प्रथम या परीक्षेत विशेष योग्यता श्रेणीत प्राविण्य मिळवले. तसेच प्रियांका देठे आणि डॉ स्नेहल कुलकर्णी यांनी गायनाच्या प्रवेशिका प्रथम परीक्षेत प्रथम श्रेणीत यश प्राप्त केले आहे. 

गायनासाठी या सर्व विद्यार्थ्यांना सौ.अमृता बेडेकर आणि तबला वादन साठी सार्थक डावरे यांनी मार्गदर्शन केले.

स्वरोहम संगीत अकादमीने प्रथम वर्षापासूनच गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत भरघोस यशाची आपली परंपरा यंदाही कायम राखली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post