करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोपटराव पवार यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे महत्वाची मागणी

 

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोपटराव पवार यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे महत्वाची मागणी



नगर : -  हॉस्पिटल डिस्चार्ज घेतलेले पेशंट घरी सोडले जातात. मात्र घरी गेल्यानंतर विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे सदर पेशंट कुटुंबात व समाजात वावरतात. त्यामुळे इतर व्यक्तीना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहराबरोबर ग्रामीण भागात कोविड चा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु आहे. त्याचा प्रचंड ताण हा आरोग्य यंत्रणेवर आलेला आहे. तरी त्यासाठी स्वतंत्र नियमावली करून हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिलेल्या पेशंटला घरी न नेता १४ दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी स्वच्छतागृह, पाणी व राहण्याची चांगली व्यवस्था असेल असे मंगलकार्यालय, शाळा, कॉलेजस है ताब्यात घेऊन व्यवस्था करण्यात यावी या बाबतचे निवेदन आदर्श गाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे


पेशंटला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर सदर पेशट हा विलगीकरण कक्षात दाखल होतो की नाही याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा . त्याची जबाबदारी दयावी  एखादा पेशंट नजर चुकवून विलगीकरण कक्षात न जाता घरी गेल्यास पोलीस यंत्रणेला कळवून त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. विलगीकरण कक्षात पेशंटला वेळेवर गोळ्या, जेवण एवढीच व्यवस्था करण्याची गरज आहे. एखादा पेशंट जास्त क्रिटीकल परिस्थितीमध्ये असल्यास त्याला पुन्हा हॉस्पिटल पर्यंत पोचविण्याची जबाबदारी हि विलगीकरण कक्षाची राहील अशा काही उपयायोजना कराव्यात. 

सध्या संपूर्ण आरोग्य यंत्रणा ऑक्सिजन व इंजेक्शन यात व्यस्थ असून तातडीने विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. तरी आपल्या स्तरावरून योग्य तो निर्णय व्हावा हि विनंती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post