पिंपळगाव जोगातून ९ एप्रिलला आवर्तन सुटणार !
पारनेर : पिंपळगाव जोगा धरणातून दीड महिना उलटूनही पारनेर तालुक्यातील कळस, पाडळी आळे, अळकुटी, शेरी कासारे, रांधे, पाबळ, लोणी मावळा ,देवीभोयरे, वडझिरे टेल या गावांना आवर्तनातून पाणी मिळाले नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी बांधव यांना सोबत घेऊन आज ( शुक्रवारी ) वाडेगव्हाण येथील कुकडीच्या कार्यालयात कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेत पारनेर तालुक्यातील गावांना आवर्तनातून तातडीने पाणी द्यावे अशी मागणी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली .त्यानुसार पुणे येथील कुकडी सिंचन कार्यालयात ९ एप्रिल रोजी या संबंधीची अधिकृत बैठक होणार असून ९ एप्रिलला संध्याकाळी पारनेर तालुक्यातील गावांना पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले अशी माहिती आ.निलेश लंके यांनी दिली.
रब्बी हंगामासाठी महत्त्वपूर्ण समजणाऱ्या पिंपळगाव जोगा धरणातुन हक्काचे आवर्तन मिळणार असल्याने पिकांना व फळबागांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
शुक्रवारी माझ्या समवेत कुकडी सिंचन शाखेचे अधीक्षक अभियंता हं.तु. धुमाळ नारायणगाव कुकडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, कुकडी प्रकल्पाचे श्रीगोंद्याचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, उपअभियंता सुहास साळवे यांच्या सह शेतकरीसह आवर्तना संदर्भात बैठक घेण्यात आली.
तसेच यावेळी कुकडी डाव्या कालव्याची पहाणी करून पडझड झालेल्या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करून गळती थांबवावी अश्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या!
यावेळी बाबाजीशेठ भंडारी, उपसरपंच संतोष काटे, महेश शिरोळे, बाळासाहेब पुंडे, बाळासाहेब म्हस्कुले,किरण डेरे, डॉ.सुभाष मावळे, विलास शेंडकर, संदेश कापसे,सतीश डेरे, विजय थोरात,चंद्रकांत डेरे, राजू येवले ,संतोष शेंडकर, किशोर यादव ,जालिंदर शेळके, अशोक शेळके, अमोल यादव यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment