पंढरपुरात भाजप बाजी मारणार ! 'या' संस्थेच्या एक्झिट पोलने वर्तवला अंदाज

 

पंढरपुरात भाजप बाजी मारणार? एक्झिट पोलने वर्तवला अंदाजपंढरपूर:  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. येत्या 2 मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीचा एक्झिटपोल आला असून त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव होताना दिसत आहे. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा निसरडा विजय होताना दिसत आहे. 

या निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना 95508, समाधान आवताडे यांना 98946, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना 7124, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना 8619, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना 6596 आणि इतरांना 8693 मते मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे 3438 मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post