करोना रूग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे जि.प. शिक्षकांकडून समुपदेशन करावे

करोना रूग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे जि.प. शिक्षकांकडून समुपदेशन करावे: जालिंदर वाकचौरे यांची मागणीनगर :  कोरोना रुग्ण व कुटूंबियांना समुपदेशनाचे काम जिल्ह्यातील शिक्षकांनी करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे. खरंतर गेल्या वर्षांपासून कोरोनानी हाहाकार माजलाय. आता तर रुग्ण संख्याही वाढतेय. त्यात आणखी नवीन समस्या समोर येताय, कोरोना रुग्णाच्या मानसीक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा कुटुंबातील लोकांवर मोठा परिणाम होतोय. त्या मुळे काही शिक्षकांना समुपदेशन प्रशिक्षण देऊन रुग्णांना व कुटुंबाला मानसिक आधार द्यावा. तशाही वर्षांपासून शाळा बंदच आहे. केव्हा सुरू होतील हेही सांगता येत नाही. पण हेच काम शिक्षकांनी केले तर हा नवीन उपक्रम इतर जिल्ह्यात राबवतील म्हणून ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहावे. शहरात पण ह्या समस्या आहेत तेथे मानसोपचार तज्ञ असतात. पण ग्रामीण भागात ते नाहीं. तरी शिक्षकांनी सगळे नियम पाळून किंवा सोशल मीडियाचा वापर करून जनजागृती व समुपदेशन करू शकतात.जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा उपक्रम राबवून राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post