पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची राष्ट्रीय पातळीवरील समितीवर निवड

 पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांची राष्ट्रीय पातळीवरील समितीवर निवड



नगर - सीड मदर म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांची राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकार कृषी मंत्रालया तर्फे स्थापन करण्यात आलेल्या प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट 1012 अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील निवड समितीवर त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

त्यांच्या निवडी संदर्भातील ई-मेल नुकताच प्राप्त झालेला आहे अशी माहिती बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे यांनी दिली. डॉक्टर टी. के . नागरत्ना रजिस्टार प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट ॲक्ट कृषी विभाग, भारत सरकार यांनी या निवडीचे पत्र पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना पाठवलेले आहे.

या समिती मार्फत देशपातळीवर पारंपारिक बियाणे संवर्धन निर्मिती संगोपन व प्रचार प्रसार करणाऱ्या व्यक्ती ,संस्था ,मंडळ व समित्या ,यांची निवड राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी करण्यात येते. देशातील उत्कृष्ट बीज संवर्धक निवडण्याची जबाबदारी या समितीवर असते. देशपातळीवर दरवर्षी सुमारे 85 लाख रुपये किमतीचे पुरस्कार या समितीच्या माध्यमाने निवडण्यात आलेल्या शेतकरी, संस्था व व्यक्तींना दिले जातात. देशपातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्कारांचे वितरण व रक्कम याच विभागामार्फत केली जाते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post