जि.प.सदस्य कांतीलाल घोडके यांचे निधन

जि.प.सदस्य कांतीलाल घोडके यांचे निधननगर : राशीन जिल्हा परिषद गटाचे जि. प. सदस्य  कांतीलाल दादा घोडके यांचे रविवार दि. 11/4/21 रोजी रात्री कोरोनाने पुणे येथे दुःखद निधन झाले .अत्यंत बोलके व मनमोकळ्या स्वभावाचे कांतीलाल घोडके हे संघाचे स्वयंसेवक होते, त्यांनी आपल्या वक्तृत्वाने आपले वेगळे पनाणे सर्वाना जिंकले होते. ते भाजपाच्या तिकिटावर राशीन गटातून निवडून आले होते. घोडके आपल्यातून गेले ही मनाला धक्कादायक वेदना देणारी व दुःखदायक घटना आहे त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो या सद्गुरू गोदड महाराज व आई जगदंबेला प्रार्थना करताना माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post