नवनागापूरला कोवीड केअर सेंटर सुरू करावे - उपसभापती डॉ. दिलीप पवार

 नवनागापूरला कोवीड केअर सेंटर सुरू करावे - उपसभापती डॉ. दिलीप पवार अहमदनगर - नगर तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या दिवसो दिवस मोठया प्रमाणात वाढत असून त्यातील बहुसंख्य रूग्ण सौम्य लक्षणाचे आहे . नगर शहरात सर्व रुग्णालया मध्ये बेडसचा तुटवडा असल्याने हे रुग्ण घरीच राहत आहे. नवनागापूर परिसरात कोवीड सेंटर सुस करावे याबाबतचे निवेदन पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी तहसीलदार उमेश पाटील यांना दिले .

 एमआयडिसी येथे कामगार व गोची संख्या मोठया प्रमाणात आहे .नवनागापूर , वडगाव विळ५ देहरे , नागापूर , निंबळक परीसरातील लोक एमआयडीसी येथे कामाला जातात  या भागात अश्या रुग्णाची संख्या मोठया प्रमाणात आहे . लोकसंख्येनी मोठी असणाऱ्या नवनागापूर या गावामध्ये केअर सेंटर सुरू करणे गरजेचे आहे . या भागातील कामगार मध्यमवर्गीय आहे हातावर पोट आहे या नागरिकाना शहरा मधील रूग्णालये परवडणारे नाहीत . तसेच चास व टाकळी काझी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुद्धा केअर सेंटर सुरू करणे गरजेचे आहे . वरील ठिकाणी हि सुविधा मिळाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय न होता रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल . सध्या शहरातील सर्वच रुग्णाची कोंडी होत आहे रुग्णालय हतबल आहे अशा परिस्थित नवनागापूर, चास, टाकळी काझी येथे को वीड केसर सेंटर सुरू करावे हि विंनती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post