पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी कॉंग्रेसचा जिल्हा सरचिटणीस कसा? त्याची हकालपट्टी करावी

संपदा पतसंस्था भ्रष्टाचारातील मुख्य आरोपी ज्ञानदेव वाफारे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करावी


जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांची प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी

      नगर - नगरमधील संपदा पतसंस्थेच्या 32 कोटींच्या भ्रष्टाचारातील मुख्य आरोपी व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानदेव वाफारे यांची काँग्रेस पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केली आहे.


    ‘वाफारे व अन्य संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव 32 कोटींच्या ठेवी वसूल कराव्यात व त्यांचे ठेवीदारांना वाटप करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने यापूर्वीच दिला होता, त्याला वाफारे याने स्थगिती घेतली होती. ही स्थगिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने उठविली असून, वाफारे व अन्य संचालकांच्या मालमत्तेच्या लिलावाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याच कारणासाठी वाफारे याने काही महिने तुरुंगाची हवा अनुभवली आहे. गोर-गरीबांच्या ठेवी लुटणार्‍या वाफारे याला जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस संघटनेत जिल्हा सरचिटणीस बनवून ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. भ्रष्ट प्रतिमेच्या लोकांना पदे देण्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांनी ज्ञानदेव वाफारे यांची काँग्रेस पक्षातून त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, विद्यमान प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर,  पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान,  महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ.सविता मोरे, भिंगार महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मार्गरेट जाधव, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार व रवि सुर्यवंशी, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे व मुकुंद लखापती,  युवक काँग्रेसचे अज्जूभाई शेख, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, माजी पोलिस निरिक्षक एम.आय.शेख यांनी केली आहे. या मागणीच्या निवेदनाच्या प्रति महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, सहप्रभारी वामसी रेड्डी, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख यांना पाठविण्यात आल्या आहेत.


      

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post